लाल शिमला आरोग्यासाठी फायद्याचा आहे.
लाल शिमला मिरची, सर्वात जास्त पिकलेली असल्याने, गोड असते. यामध्ये काही पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते.
लाल शिमला मिरचीमध्ये ‘व्हिटॅमिन अ’चे प्रमाण भरपूर असते. जे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते.
लाल शिमला मिरचीमधील ‘व्हिटॅमिन सी’ शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करतात.
यामधील अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे हृदय निरोगी राहते व रक्तदाब नियंत्रित राहतो.
नियमित लाल शिमला मिरची खाल्ल्याने त्वचा तजेलदार दिसते.
लाल शिमला मिरचीमध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
लाल शिमला मिरची सर्वात गोड आहे आणि तिची थोडीशी फळांसारखी चव आहे.
लाल शिमला मिरची सलाडमध्ये कच्ची देखील वापरु शकतात.