करवंद हे उन्हाळी रानटी फळ आहे. जे खाऊन शरीराला अनेक फायदे मिळतात.
उन्हाळ्यात करवंद खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते आणि शरीर फ्रेश राहते.
करवंदामध्ये व्हिटॅमिन C चांगल्या प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
करवंदातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि अॅसिडिटी किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी करवंद उपयुक्त ठरते आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.
अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकून राहण्यास मदत होते आणि त्वचा ताजीतवानी दिसते.
करवंद नैसर्गिक ऊर्जा देणारे फळ मानले जाते. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा कमी होण्यास मदत मिळू शकते.