तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हिवाळ्यात तुळशीचा चहा प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
चहा प्याल्यानंतर ज्या लोकांना गॅस किंवा अपचनाचा त्रास होतो, त्यांनी तुळशीची चहा प्यायल्यास त्यांना पचनक्रियेत मदत होते.
तुळशीमध्ये असे घटक असतात जे मनाला शांत करतात आणि चिंता आणि नैराश्य कमी करू शकतात.
या चहाचे सेवन केल्याने घसा खवखवणे, खोकला आणि सर्दी यापासून आराम मिळतो.
तुळशीमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बायोटिक गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
तुळशीची पानं पाण्यात उकळून तुळशीचा चहा बनवता येतो. तो दुधाशिवायही पिता येतो.