कोकणात सुंदर पर्यटनस्थळे आहेत, जिथे तुम्ही निसर्गाचा आणि समुद्राचा आनंद घेऊ शकता.
सध्याच्या कडक उन्हाळ्यात शरिराला आणि मनाला गारवा द्यायचा झाला तर कोकणाला जावं लागतंय.
गणपतीपुळे : हे सुंदर शहर आपल्या स्वच्छ समुद्रकिनाऱ्यासाठी आणि स्वयंभू गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
तारकर्ली : निळ्याशार पाण्यासाठी आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी तारकर्ली उत्तम ठिकाण आहे.
मालवण : ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि सुंदर समुद्रकिनारे मालवणची ओळख आहेत.
अलिबाग : मुंबई आणि पुण्याजवळ असलेले अलिबाग एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.
गुहागर : हे शांत आणि सुंदर ठिकाण आपल्या नारळ आणि सुपारीच्या बागांसाठी ओळखले जाते.
श्रीवर्धन आणि दिवेआगर : ही जुळी गावे त्यांच्या अप्रतिम समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखली जातात.
वेंगुर्ला : इथले रमणीय समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक डच वखार पर्यटकांना शांत आणि सुंदर अनुभव देतात.
दापोली : मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे दापोली थंड हवामान आणि हिरवीगार निसर्गरम्यता यासाठी प्रसिद्ध आहे.