माघ मेळ्यात तरुणीचा जलवा
सोशल मीडियावर सध्या बासमतीच्या डोळ्यांची जादू पसरली असून तिला पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत.
कोणताही भारी मेकअप नसताना केवळ तिच्या साध्या रूपाने बासमतीने इंटरनेटवर आग लावली असून तिची तुलना आता मोनालिसाशी होत आहे.
प्रयागराजच्या माघ मेळ्यात माळा आणि दातवण विकण्यासाठी आलेल्या या तरुणीला पाहण्यासाठी आता लोकांची मोठी गर्दी उसळत आहे.
बासमतीचे डोळे आणि तिचे हावभाव पाहून अनेक युजर्सनी तिला 'प्रयागराजची शान' म्हटले असून तिचे व्हिडिओ लाखोंच्या घरात पाहिले जात आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र कॅमेरे आणि चाहत्यांचा गराडा असल्याने बासमतीला आपले रोजचे काम करणे मात्र कठीण झाले आहे.
गेल्या वर्षी गाजलेल्या मोनालिसापेक्षाही बासमती अधिक निष्पाप आणि सुंदर असल्याचे अनेक सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे.
मोनालिसा प्रमाणेच बासमतीला सुद्धा एखादी चित्रपटाची ऑफर मिळेल का? याकडे आता तिच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, नाकात नथ आणि कानात कुंडल अशा अस्सल पारंपरिक लुकमध्ये बासमती खूपच उठून दिसत आहे.
प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतरही बासमतीचे साधे राहणीमान आणि तिची बोलण्याची पद्धत लोकांच्या मनाला थेट भिडत आहे.