केसांच्या वाढीसाठी कामी येईल केळीची साल...!

कसा करायचा वापर? जाणून घ्या...

केसांची वाढ व्यवस्थित व्हावी, यासाठी लोक विविध प्रकारचे महागडे तेल आणि शाम्पू वापरतात. मात्र तरीही केसांची चांगली वाढ होत नाही.

बरेच लोक केसांवर केळीचे हेअर पॅक लावतात, पण आपण कधी केळीच्या सालीचा वापर केलाय का?

केळीच्या सालीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, जीवनसत्त्वे, खनिजे असे अनेक पोषक घटक असतात. जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात.

चला तर जाणून घेऊयात, केळीच्या सालीचा वापर कसा करावा आणि त्याचे काय फायदे होऊ शकतात?

केळीची साल कापून सुमारे १५ मिनिटे पाण्यात उकळवा आणि ती थोडावेळ पाण्यातच राहू द्या.

नंतर हे पाणी थंड करा. पाणी कोमट झाल्यावर केसांच्या स्कॅल्पवर लावा आणि मसाज करा.

हे पाणी सुमारे अर्धा तास केसांवर राहू द्या. नंतर शाम्पूने केस धुवा.

केळीच्या सालीचे पाणी सातत्याने लावल्याने केसांची वाढ चांगल्या प्रकारे होईल आणि मजबूतही होतील.

याशिवाय, केसांचे गळणे आणि तुटणेही मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच केस चमकदारही होतील. 

सापांना आमंत्रण देतात ही झाडं...! तुमच्या घराजवळ तर नाहीत ना?

Click Here