प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत सरकार गरीब आणि गरजू कुटुंबांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देत आहे.
Ayushman Card: आजच्या काळात आरोग्य उपचार महाग होत चालले आहेत. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना अनेक गंभीर आजारांवर उपचार घेणे कठीण होत आहे.
यासाठी सरकार प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत देशातील गरीब आणि गरजू कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते. यासाठी तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवावे लागेल.
उत्पन्न कमी असो वा जास्त, या योजनेत 70 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व लोकांना समाविष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय, ते लोकदेखील या योजनेसाठी पात्र आहेत, ज्यांना इतर कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
परंतू, करदाते, आर्थिकदृष्ट्या श्रीमंत लोक, पीएफ किंवा ईएसआयसीची सुविधा मिळवणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही, हे तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल http://beneficiary.nha.gov.in/ वर जा
'मी पात्र आहे का' या पर्यायावर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमचे नाव, राज्य, जिल्हा इत्यादी भरा. नाव यादीत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
या योजनेत हृदयरोग, कोरोनरी धमनी रोग, हृदयविकाराचा झटका, कॉन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, उच्च रक्तदाबाशी संबंधित गुंतागुंत, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोग...
स्तन, गर्भाशय ग्रीवा, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, न्यूरोलॉजिकल रोग, अर्धांगवायू, ब्रेन ट्यूमर, एपिलेप्सीसह अनेक आजार आणि अपघात कव्हर केले जातात.