सोने खरेदी करताना 'या' चुका टाळा

सोने खरेदी करताना काही चुका केल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

नेहमी हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करा. हॉलमार्क सोन्याच्या शुद्धतेची हमी देतो. 

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध (९९.९%) असते, पण त्याचे दागिने सहसा बनवले जात नाहीत. दागिने २२ कॅरेटचे (९१.६%) असतात.

दागिन्यांवर लागणारे मेकिंग चार्जेस नेहमी तपासा. वेगवेगळ्या दुकानांमध्ये तुलना करून मेकिंग चार्जेस कमी करण्याचा प्रयत्न करा.

दागिने खरेदी करताना त्याचे वजन काटेकोरपणे तपासा. 

अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे वजनात फरक येऊ शकतो, ज्यामुळे तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.

सोने खरेदी केल्यावर पक्के बिल घ्यायला विसरू नका. बिलावर सोन्याची शुद्धता, वजन, मेकिंग चार्जेस, आणि हॉलमार्क क्रमांक स्पष्टपणे नमूद असावा.

सोने खरेदी करण्यापूर्वी त्या दिवसाचा सोन्याचा दर तपासा. दररोज सोन्याच्या दरात बदल होत असतो.

ऑनलाइन सोने खरेदी करताना, विश्वासार्ह वेबसाइट्स आणि विक्रेत्यांकडूनच खरेदी करा.

जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोने घेत असाल, तर नाण्यांना किंवा बारला प्राधान्य द्या.

मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी कॅशमध्ये करणे टाळा. यामुळे तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येऊ शकते.

Click Here