फोन चार्जिंगसाठी Power Bank वापरताय?

अनेक जण फोन चार्जिंगसाठी पॉवर बँकेचा वापर करतात.

मोबाईल सध्या आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल शिवाय आपली कामे होत नाहीत.

वाढत्या वापरामुळे फोनची बॅटरी दिवसभर टिकत नाही. यामुळे लोक त्याला दिवसातून कधी दोनदा तर तिनदा चार्ज करतात. त्यामुळे हल्ली अनेकांकडे पॉवर बँकचा पर्याय उरला आहे.

प्रवासात पॉवर बँक खूपच चांगला उपाय असल्यामुळे अनेक लोक आपल्यासोबतच तो ठेवतात. प्रवासात किंवा बाहेर असताना तो जणू ‘मोबाईलचा ऑक्सिजन सिलिंडर म्हणूनच काम करतो जो आपल्या फोनला बंद होऊ देत नाही.

पण, वारंवार पॉवर बँकने चार्जिंग केल्याने तुमच्या मोबाईलच्या बॅटरीचं आयुष्य कमी होतं.

स्मार्टफोन आता केवळ संवादाचं साधन राहिलं नाही, तर तो काम, मनोरंजन आणि शिक्षणाचा भाग बनला आहे.

स्क्रीन टाइममुळे आणि अॅप्सच्या वापरामुळे बॅटरी झपाट्याने रिकामी होते. त्यामुळे पॉवर बँक हा लोकांसाठी ‘ऑन-द-गो’ चार्जिंगचा सोपा पर्याय झाला आहे.

बॅटरी हेल्थवर होतो वाईट परिणामजर तुम्ही दरवेळी पॉवर बँकद्वारेच फोन चार्ज करत असाल, तर हे बॅटरीच्या ‘सेल्स’वर अतिरिक्त ताण टाकतं. 

बॅटरीची क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि फोनचा बॅकअप कमी होतो. विशेषतः iPhone वापरणाऱ्यांनी याकडे लक्ष द्यायला हवं, कारण त्यांची बॅटरी लाइफ पटकन घटते.

एक लपलेला धोकापॉवर बँकद्वारे चार्जिंग करताना फोनला चार्ज होण्यासाठी अधिक वेळ लागतो. 

काही वेळा अशा गरम झालेला फोन फुटला असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

यामुळे फोन गरम होऊ लागतो आणि दीर्घकाळ अशा स्थितीत राहिल्यास बॅटरीसह फोनच्या इंटरनल पार्ट्सना देखील हानी पोहोचू शकते. 

एक लपलेला धोकापॉवर बँकद्वारे चार्जिंग करताना फोनला चार्ज होण्यासाठी अधिक वेळ लागतो. 

आधीच महागड्या पॉवर बँकमुळे ही फोनला धोका आहेच, त्याच बाजारात अनेक स्वस्त आणि नकली पॉवर बँक उपलब्ध असतात ज्यात सर्किट प्रोटेक्शन नसतं.

सुरक्षित चार्जिंगसाठी काही उपयुक्त टिप्सफोन 20% पेक्षा कमी झाल्यावरच चार्ज करा आणि 100% झाल्यावर लगेच काढा.रात्रीभर फोन चार्जिंगला लावू नका.

Click Here