अभिनेत्री अनुष्का सेन हा टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे
७८ व्या कान्स फेस्टिवलमध्ये अभिनेत्री अनुष्का सेननं तिच्या सौंदर्याची भुरळ पाडून अनेकांना घायाळ केले.
रेड कार्पेटवर अनुष्का सेन सुंदर अशा पर्पल रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. २२ व्या वर्षात तिने कान्स फेस्टिवलमध्ये डेब्यू केले
अनुष्काचा अनोखा ड्रेस तयार करण्यासाठी जवळपास ६११ तास आणि ३४ कारगीर लागले. ज्यात झरदोझी, आरी, सिल्क आणि क्रिस्टल धाग्यांचा वापर करण्यात आला आहे
अनुष्काच्या गाऊनवर फुलांचा वेल डिझाइन आहे. पॅटर्नच्या मध्यभागी एक मोर देखील बनवण्यात आला आहे, ज्यामुळे गाऊनला आकर्षक लूक मिळाला आहे
अनुष्काने तिचा लूक स्ट्रॅपलेस रॉयल गाऊन आणि कमीत कमी दागिन्यांसह जोडला. तिने एमेरल्ड हिरव्या रंगाची स्टेटमेंट रिंग देखील घातली होती.
या सुंदर गाऊनसह अभिनेत्रीने अतिशय हलका नैसर्गिक मेकअप केला आहे. ज्यामध्ये, हलक्या बेससह, डोळ्यांवर काजळ लावण्यात आलं आहे.
या लूकमध्ये अनुष्काने फ्रंट पार्टिंगसह सॉफ्ट कर्ल हाय बन हेअरस्टाईल तयार केली आहे. हा केसांचा अंबाडा खूप सुंदर दिसत आहे.