तुळशीच्या पानांचे आपल्या शरीरासाठी मोठे फायदे आहेत.
तुळशीमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवून सर्दी, खोकला आणि घशाच्या त्रासांपासून बचाव करते.
तुळशीची पाने खाल्ल्याने पोटाचे आरोग्य सुधारते आणि अपचन, बद्धकोष्ठता, गॅस व पोट फुगण्याची समस्या कमी होते.
तुळशीतील अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-मायक्रोबिअल गुणधर्मांमुळे कफ कमी होतो आणि श्वसनाचे आरोग्य सुधारते.
तुळशीच्या पानांचे सेवन तणाव पातळी कमी करण्यास मदत करते.
तुळशीचा रस शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून आतड्यांचे आरोग्य सुधारतो आणि पोट स्वच्छ करतो.
तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन आणि खनिजे असल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
तुळशीच्या पानांचे जास्त प्रमाणात सेवन करु नये. तुळशीच्या पानांमधील काही आम्लयुक्त घटक दातांच्या इनॅमलला नुकसान पोहोचवू शकतात.
गर्भवती महिलांनी तुळशीचे सेवन करणे टाळावे, कारण ते मासिक पाळीला सुरुवात करू शकते.