झोपेतून उठल्यावर प्या पाणी! 'या' ५ समस्या पळतील कोसोदूर
पाणी पिण्याचे असंख्य फायदे
शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचं आहे हे काही वेगळं सांगायला नको.
पचनक्रिया सुरळीत करण्यापासून ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकेपर्यंत अनेक काम पाण्यामुळे होतात. म्हणूनच, पहाटे उठल्यानंतर प्रथम पाणी पिण्याचे कोणते फायदे आहेत ते पाहुयात.
रात्री झोपल्यामुळे बराच काळ शरीर डिहायड्रेट होतं. त्यामुळे सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता दूर होते. व शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया सुरळीत होतात.
सकाळी पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म पुढील काही तासांसाठी ३० टक्क्यांनी वाढतं. याने तुम्हाला दिवसभर कॅलरी बर्न करण्यास मदत मिळते.
रात्रभर तुमचं शरीर रिकव्हरी मोडवर असतं. ज्यामुळे शरीरात वेगवेगळे विषारी पदार्थ जमा होतात. अशात सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात.
सकाळी पाणी प्यायल्याने पचन तंत्र स्टिमुलेट होतं, ज्यामुळे मलत्याग करण्यास अडचण येत नाही. पोट लवकर साफ होतं.
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी प्यायल्याने त्वचा चांगली राहते. तसेच त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासही मदत मिळते.