गुजरातच्या अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान खाली कोसळून भीषण दुर्घटना घडली
अहमदाबादच्या विमानतळावरून लंडनसाठी उड्डाण घेतलेले विमान टेकऑफनंतर काही मिनिटांच एका हॉस्टेलवर कोसळले
या अपघातानंतर बरेच फोटो समोर आलेत, त्यात एका इमारतीवर विमानाचा काही भाग लटकल्याचे पाहायला मिळाले
BJ मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या हॉस्टेलवर हे विमान जाऊन पडले, या अपघातामुळे मोठा गोंधळ उडाला
विमानाचे मागील चाक इमारतीची भिंत तोंडून आत घुसले. जिथे हे विमान कोसळले तिथे सगळे उद्ध्वस्त झाले होते.
जिथे हे विमान कोसळले तिथे काही डॉक्टर लंचसाठी आले होते. विमानाची चाके इमारतीला धडकल्याने भिंतीचा काही भाग मोडला
ही दुर्घटना घडली तेव्हा काही लोक तिथे जेवत बसले होते. टेबलावर जेवणाचे ताट दिसत असून विमान धडकताच मोठा आवाज आला
हा एक फोटो आहे ज्यात अपघातानंतर किचनची अवस्था दिसून येते. जमिनीवर अन्न आणि भांडी विखरून पडल्याचे चित्र दिसून आले.