विमानाच्या पायलटला पगार किती मिळतो? 

अनेकांना लहानपणी आकाशात विमानांना उडताना पाहून मोठेपणी पायलट व्हायचे असते.

काही दिवसांपूर्वी एअर टर्ब्युलन्समुळे गोइंडिगोचा पायलट चर्चेत आला होता. आता एअर इंडिया विमानाच्या अपघातामुळे पुन्हा एकदा पायलट चर्चेत आले आहेत. 

अनेकांना लहानपणी आकाशात विमानांना उडताना पाहून मोठेपणी पायलट व्हायचे असते. परंतू खरोखर त्यातील किती जण पायलट होतात, हाताच्या बोटावर मोजण्याइतके. 

या पायलटना पगार किती असतो, त्यांचे काम काय असते, एवढ्या गोष्टी ते लक्षात कसे ठेवतात असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील...

विमानाचा पायलट बनने ही खूप मोठी गोष्ट आहे, तेवढीच जोखमीची आणि जबाबदारीचीही. त्यासाठी अभ्यास, कठोर ट्रेनिंग आणि हजारो तासांचे उड्डाण या गोष्टी कराव्या लागतात तेव्हा कुठे हे पद मिळते. 

कमर्शियल पायलट होण्यासाठी उमेदवारांनी फिजिक्स आणि मॅथ्स या विषयांसह बारावी पास असावे लागते. यानंतरच ते मान्यताप्राप्त फ्लाइंग स्कूलमधून प्रशिक्षण घेऊ शकतात. 

तसेच यातून पार झाल्यावरच डीजीसीए कमर्शियल पायलट लायसन्स जारी करते. 

या लायसन्ससाठी २०० तासांचे फ्लाईंग ट्रेनिंग आणि परीक्षा पास करावी लागते. या सगळ्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे खूप पैसा लागतो. या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची फी लाखांत असते. 

पायलट जर फ्रेशर असेल तर त्याचा महिन्याचा पगार हा दीड ते तीन लाख एवढा असतो. त्याचा अनुभव जसा वाढेल तसा त्याचा पगारही लाखांत वाढतो. 

२-५ वर्षांचा अनुभव असेल तर महिन्याला ४ ते ६ लाख रुपये कमवू शकतो. 

५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या पायलटला कॅप्टनपद मिळू शकते, त्याला ८ ते १२ लाख पगार असतो. 

जर आंतरराष्ट्रीय उड्डाणे करणारा असेल तर पगारात महिन्याला २-३ लाख रुपये जास्त मिळू शकतात. डोमेस्टिक पायलट असेल तर त्याच्या मार्गावर हा पगार अवलंबून असतो. 

या पायलटना लांबच्या पल्ल्यासाठी विमान उतरविल्यावर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये विश्रांतीची सोय केली जाते. 

Click Here