दुपारी झोपणं हे कितीही सुखद वाटलं तरी त्याचे फायदे-तोटे काय ते समजून घेतलं पाहिजे.
अनेकांना दुपारी जेवल्यानंतर वामकुक्षी अर्थात झोपायची सवय असते. दुपारी झोपणं हे कितीही सुखद वाटलं तरी त्याचे फायदे-तोटे काय ते समजून घेतलं पाहिजे.
तज्ज्ञांच्या मते, वामकुक्षी घेतल्यामुळे आरोग्य सुधारु शकतं. परंतु, चुकीच्या पद्धतीने ही झोप झाली तर त्याचा शरीरावर विपरित परिणामही होऊ शकतो.
अनेक अभ्यासांनुसार, दुपारी झोप घेणे तुमच्या मेंदूसाठी चांगलं आहे. परंतु, झोपचा कालावधी नियंत्रणात असणंही तितकंच गरजेचं आहे.
प्रौढ व्यक्तींनी साधारणपणे ३० ते ९० मिनिटांची झोप घ्यावी. त्यापेक्षा जास्त घेतल्यास आकलनशक्तीवर परिणाम होतो.
दुपारी झोपल्यामुळे आपल्याला कफ, शिंका येणे व अंगात आळस भरणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
दिवसा झोपल्याने आणि रात्री जागरण केल्याने रक्तदाब, हृदयविकार व मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने लठ्ठपणा, मधुमेह, कोलेस्ट्रॉल व पचन आणि जीवनशैलीशी संबंधित इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.