भाजपा करणार नितीश कुमारांना 'रिजेक्ट'? निकालानंतर गणित बदललं

बिहार निवडणुकीच्या निकालानं राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात सुरुवातीपासून एनडीएनं बहुमत मिळवले. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष बनला आहे

बहुमताचा १२२ चा आकडा गाठणे एनडीएला कठीण नाही. मात्र मुख्यमंत्रि‍पदी भाजपा नितीश कुमारांना पुन्हा संधी देणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे

भाजपाकडे ९१ तर जेडीयूकडे ८४ जागा आहेत. त्यात चिराग पासवान यांच्या पक्षाला २१ आणि जीतन राम मांझी यांच्या पक्षाला ५ जागा मिळाल्या आहेत. 

त्यात नितीश कुमारांना वगळले तर भाजपा, एलजेपी, हम आणि आरएलएम असे एनडीएतील घटक पक्षांकडे १२२ जागांचा बहुमताचा आकडा आहे

भाजपाला शह देण्यासाठी नितीश कुमारही खेळी करतील. आरजेडीसह काँग्रेस, सीपीआयसोबत जाऊ शकतात, मात्र बहुमतासाठी ८ जागांची गरज भासेल

जर नितीश कुमारांनी असा डाव साधला तर भाजपानेही जेडीयूत फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे सध्या नितीश कुमारांकडे अधिक पर्याय नाही

बिहारचा निकाल पाहता भाजपा पुन्हा नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपद देते की, त्यांना रिजेक्ट करून स्वत:चा मुख्यमंत्री बसवते हे पाहणे गरजेचे आहे

Click Here

Your Page!