Ghibli नंतर आता Nano Banana ट्रेंड सुरू झाला आहे.
आधी Ghibli ट्रेंडने नेटिझन्सना वेड लावले, आता Nano Banana AI ची क्रेझ सर्वत्र दिसून येते आहे.
Google Gemini च्या Nano Banana च्या मदतीने मुली मोठ्या प्रमाणावर एआय साडी ट्रेंडचा वापर करत आहेत.
तसेच, याच टुलच्या मदतीने अनेकजण स्वतःच्या पर्सनल फोटोंना 3D लुक देत आहेत.
मात्र, या नव्या ट्रेंडमध्ये सहभागी होताना लोक नकळत आपल्या प्रायव्हसीशी तडजोड करत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
सुरुवातीला काही लोकांनी विशिष्ट प्रॉम्प्ट्स वापरुन अशा प्रकारचे फोटो तयार केले आणि त्यानंतर ते प्रॉम्प्ट्स व्हायरल झाले.
परिणामी आज जवळजवळ प्रत्येकजण या फोटोंची नक्कल करून ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.
या ट्रेंडच्या आहारी जाताना लोक नकळत आपला पर्सनल डेटा व फोटो एआयसोबत शेअर करत आहेत. असे करताना गंभीर प्रायव्हसी रिस्क उद्भवू शकतो.
जेव्हा आपण एआय प्लॅटफॉर्मवर फोटो अपलोड करतो, तेव्हा तो फोटो आणि त्यासंबंधित डेटा कंपनीच्या सर्व्हरवर सेव होतो.
कंपन्या डेटा सुरक्षित ठेवण्याचा दावा करतात खरा, पण त्याचा वापर इतर कोणत्याही कारणासाठी केला जाण्याची शक्यता कायम असते.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोणताही ट्रेंड असो, तो लोकप्रिय झाला म्हणून आपल्या प्रायव्हसीशी कधीही तडजोड करू नये.
एआयवर पर्सनल फोटो, व्हिडिओ किंवा इतर खाजगी माहिती अपलोड करण्यापूर्वी विचार करावा. अन्यथा अल्पकालीन मजा दीर्घकालीन अडचणीत निर्माण करू शकतात.