बिश्नोई समाज झाडं, प्राणी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी प्राणही देण्यास तयार असतात.
बिश्नोई धर्माचे संस्थापक गुरु जम्भेश्वर यांनी दिलेल्या १५ वचनांपैकी अनेक वचनं पर्यावरण रक्षणाशी संबंधित आहेत.
त्यामुळे बिश्नोई समाज झाडं, प्राणी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी प्राणही देण्यास तयार असतात.
जोधपूरच्या महाराजांनी नवीन राजवाडा बांधण्यासाठी खेजडली गावातील खेजडी झाडं तोडण्याचे आदेश दिले. झाडं तोडायला आलेल्या सैनिकांना बिश्नोई समाजाने विरोध केला.
अम्मृता देवी नावाच्या धैर्यवान महिलेनं झाडाला मिठी मारून सांगितलं – "झाड तोडण्यापूर्वी मला ठार करा." सैनिकांनी तिचा शिरच्छेद केला. तिच्या तीन मुलींनीही त्याचप्रमाणे बलिदान दिलं.
अम्मृता देवींच्या मागोमाग एकूण ३६३ बिश्नोई स्त्री-पुरुषांनी झाडांना मिठी मारून आपलं प्राणार्पण केलं. ही घटना मानव इतिहासातील सर्वात मोठ्या पर्यावरणीय बलिदानांपैकी एक मानली जाते.
बिश्नोईंच्या बलिदानानं हलून जाऊन जोधपूरच्या महाराजांनी झाडतोड थांबवली आणि त्या भागात झाडं न तोडण्याचा आदेश कायमस्वरूपी दिला.