मोनो रेल कलंडली, प्रवाशी गुदमरले; मुंबईत मोठा अपघात टळला
'मोनोरेल' बंद पडल्यानंतरचे व्हिडीओ
अतिमुसळधार पावसाने मुंबईची लोकल सेवा ठप्प झालेली असतानाच 'मोनो रेल'चा मोठा अपघात टळला.
मंगळवारी सायंकाळी मोनो रेलचा विद्युत पुरवठा अचानक बंद पडला आणि रेल्वे एका बाजूने कलंडली.
वीज पुरवठा बंद झाल्याने एसीही बंद झाला. त्यामुळे मोनो रेलेमध्ये असलेल्या प्रवाशांना गुदमरू लागले होते.
चेंबूर स्थानक ते भक्ती पार्क स्थानकादरम्यान ही घटना घडली. अचानक मोनो रेल थांबली. एसीही बंद झाल्याने प्रवाशी घाबरले.
घटना घडली तेव्हा तब्बल ५०० प्रवाशी होते, अशी माहिती मोनो रेलमधून सुखरुप बाहेर काढलेल्या एका प्रवाशांने सांगितले.
'आम्ही सायंकाळी ५.३० वाजेपासून रेल्वेमध्ये होतो. मदत कार्य एका तासानंतर सुरू झाले. ही गाडी अर्धा तास उशिराने होती. त्यामुळे खूप प्रवाशी होते', असे प्रवाशाने सांगितले.
दरम्यान, रात्री बचाव कार्य हाती घेत प्रवाशांना बाहेर काढले. अस्वस्थ वाटणाऱ्या प्रवाशांवर तिथेच उपचार सुरू करण्यात आले.