Googleवर 'हे' शब्द सर्च करताच होते जादू, स्क्रिन डान्स करते
गुगलचा वापर जगभरात केला जातो. आपल्याला एका क्लिकवर सगळी माहिती मिळते.
गुगल हे जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. येथे लोक दररोज नवीन माहिती शोधतात. पण अनेकदा गुगल हे यूझर्सचे मनोरंजनही करते.
एखाद्या सण, ऐतिहासिक दिवस किंवा कोणत्याही विशेष दिवशी गुगल डूडल पदलते. त्याच प्रकारे आता काही शब्द टाइप केल्याने गुगल सर्चमध्ये आपोआप वेगवेगळे अॅनिमेशन सुरू होतात.
हे इफेक्ट्स मोबाईल फोन आणि कॉम्प्यूटर दोन्हीवर पाहता येतात. कधीकधी लोकांना त्यांच्या फोन किंवा ब्राउझरमध्ये बिघाड झाला असं वाटतं. परंतु काळजी करण्याची गरज नाही.
या ट्रिक्स तुमचा फोन किंवा लॅपटॉप पूर्णपणे सुरक्षित ठेवतात. हे इफेक्ट्स फक्त काही सेकंद टिकतात आणि एकदा तुम्ही पेज रिफ्रेश केले किंवा नवीन सर्च केले की, सर्वकाही सामान्य होते.
गुगल हे इफेक्ट्स केवळ यूझर्सचे मनोरंजन करण्यासाठी आणि हलक्याफुलक्या विनोद करण्यासाठी अॅड करते. पाहूया हे कोणते खास शब्द आहेत.
जर तुम्ही गुगलमध्ये “do a barrel roll” सर्च केल्यास तुमची संपूर्ण स्क्रीन एकाच वेळी 360 डिग्री फिरेल. सुरुवातीला, स्क्रीन कंट्रोलच्या बाहेर गेल्यासारखे दिसेल, परंतु काही सेकंदात सर्वकाही सामान्य होते.
तुम्ही गुगल सर्च किंवा क्रोम अॅड्रेस बारमध्ये "Askew" टाइप करता तेव्हा, रिझल्ट पेज थोडेसे झुकते. संपूर्ण स्क्रीन वाकडी दिसते. तुम्ही नवीन शब्द शोधताच, पेज पुन्हा सरळ होते.
तुम्ही सर्च बॉक्समध्ये "67" टाइप करता तेव्हा, स्क्रीन थोडीशी हलते. काही क्षणांसाठी टाइप करणे थोडे कठीण वाटू शकते, परंतु काही सेकंदांनंतर हा परिणाम नाहीसा होतो.