मनापासून दिलेलं गिफ्ट बहिणीला खुश करेल, त्यासाठीच या १० आयडिया

रक्षाबंधनाला गिफ्ट शोधणे म्हणजे एक गोंधळच असतो.

पर्सनलाइज्ड फोटो फ्रेम
तुमचे दोघांचे जुने फोटो, एक छान कोट आणि थोडं आठवणींचं बॅकग्राउंड असलेली फ्रेम जेणेकरून हे गिफ्ट कायम स्मरणात राहील.

ज्वेलरी 
साधी, एलिगंट ज्वेलरी उदा. तिच्या नावाचं पेंडंट" ती नेहमी वापरू शकेल. आणि खुश होईल .

स्किनकेअर किंवा मेकअप किट
जर तिला सौंदर्यप्रसाधन आवडत असतील  तर branded स्किनकेअर, lipstick, फेसमास्क यांचा किट चांगला पर्याय ठरेल.

पर्सनलाइज्ड डायरी किंवा नोटबुक
तिचं नाव किंवा खास संदेश असलेली डायरी — thoughts, plans किंवा writings साठी ज्याने ती तिच्या आयुष्याचं गोल सेट करेल .

ट्रॅव्हलिंग बॅग किंवा इतर साहित्य
तिला ट्रॅव्हल करायला आवडत असेल तर छान ट्रॅव्हलिंग बॅग, शूज, सेल्फी स्टिक देऊ शकता.. ट्रॅव्हलिंग करताना तुम्ही नेहमी आठवणीत रहाल.

वॉच (घड्याळ)
स्टायलिश, decent look असलेलं घड्याळ जे ती ऑफिस, कॉलेजमध्ये सहज वापरू शकेल.

कपडे / कुर्ती / साडी
तिच्या आवडीचा रंग, साईज आणि ट्रेंड लक्षात घेऊन खरेदी केलेला ड्रेस, साडी, कुर्ता नेहमी उपयोगात येईल.

बुक लव्हर बहिणीसाठी – खास पुस्तक
तिला वाचनाची आवड असेल तर तिच्या आवडत्या लेखकाचं किंवा विषयाचं एक छान पुस्तक, आणि त्यात तुमचं हस्तलिखित पत्र देऊ शकता. 

चॉकलेट आणि स्नॅक्स हॅम्पर
ती खवय्या असेल तर खास premium चॉकलेट्स, ड्राय फ्रूट्स, हर्बल टी किंवा स्नॅक्स असलेला सुंदर हॅम्पर बॉक्स देऊ शकता.

कूपन कार्ड / शॉपिंग व्हाउचर
जर तुम्हाला तिची आवड नक्की माहिती नसेल, तर Lifestyle / Amazon / Nykaa यांचे व्हाउचर  तुम्ही देऊ शकता ती स्वतः हवं ते घेईल.

Click Here