नव्वदच्या दशकात राज्य करणारी कायनेटिक स्कूटर तुम्हाला आठवत असेलच...
नव्वदच्या दशकात राज्य करणारी कायनेटिक स्कूटर तुम्हाला आठवत असेलच... आता ती पुन्हा बाजारात अवतरली आहे.
कधीकाळी आपल्या वडिलांची ड्रीम स्कूटर असलेली... आपल्याला अंगा-खांद्यावर खेळवत आपलं बालपण जपलेली ही Kinetic नव्या अन् आधुनिक रूपात लाँच होतेय.
कायनेटिक ग्रुपने Kinetic DX EV मॉडेल बाजारात लाँच केलं आहे. त्याचं नाव त्यांनी Kinetic DX EV असं ठेवलं आहे.
ही Kinetic DX EV स्कूटर दोन व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याचं DX व्हेरिएन्ट १ लाख ११ हजार ४९९ रूपयांना लाँच करण्यात आलं आहे.
तर Kinetic DX+ EV या व्हेरिएन्टची एक्स शो रूम प्राईस ही १ लाख १७ हजार ४९९ रूपये इतकी आहे.
नव्या Kinetic DX EV चा लूक हा जुन्या Kinetic DX च्या लूकची प्रेरणा घेऊनच तयार करण्यात आला आहे.
Kinetic DX EV चे जुन्या स्टाईलचे स्विच तुम्हाला नॉस्टॅल्जिक नक्कीच करतील.
Kinetic DX EV ही सिंगल चार्जमध्ये जवळपास ११६ किलोमीटर रेंज देते असा कंपनीचा दावा आहे.
Kinetic DX EV ची इलेक्ट्रिक मोटर ही ४.८ किलोवॅटचा पीक पॉवर जनरेट करते. स्कूटरची टॉप स्पीड हे ९० किलोमीटर प्रतीतास इतकी आहे.
संपूर्णपणे मेटल बॉडी असलेल्या स्कूटरमध्ये ७०४ मिलीमीटर लांब सीट देण्यात आली आहे. याचबरोबर ३७ लीटर अंडर सीट बूट स्पेस मिळते.