एका रात्रीत पाहताे आपण ४ ते ६ स्वप्न

रात्री झाेपल्यावर राेज आपल्याला ४ ते ६ वेगवेगळी स्वप्न पडतात, हे तुम्हाला माहिती आहे का?

अनेकदा रात्री झाेप पूर्ण हाेत नाही, गाढ झाेप लागते, पण स्वप्नांमुळे झाेप पूर्णच झाल्यासारखी वाटत नाही, असा अनुभव तुम्हालाही आला असेल ना.

स्वप्न म्हणजे सत्य घटना नसते, पण झाेपेत असताना प्रत्यक्षात या घटना घडत आहेत, असा अनुभव स्वप्नातून मिळताे. 

पण, स्वप्नांची खरी गंमत माहिती आहे का? रात्री पडलेली स्वप्न सकाळी उठल्यावर ९० टक्के लाेकांना आठवतच नाहीत. 

रात्री झाेपत स्वप्न पाहताे. तेव्हा काहीवेळा खूप वेळ स्वप्न पडत असं आपल्याला वाटतं. पण, साधारणतः स्वप्नाचा कालावधी हा ५ ते २० मिनिटांचा असताे. 

स्वप्न म्हणजे आपल्या मेंदूत झाेपेत दिसणाऱ्या चित्रांचा आणि भावनांचा खेळ असताे. ती खरी घटना नसते. 

झाेपलेले असताना काहीवेळा डाेळ्यांची वेगाने हालचाल हाेत असते. अशावेळी आपण स्वप्नरंजनात रंगलेले असताे. आपल्याला स्वप्न पडत असतात.

रात्री झाेपल्यावर मेंदू दिवसभराची माहिती प्राेसेस करत असताे. आठवणी जतन करत असताे. यांच्या मिश्रणातून स्वप्न तयार हाेतात. 

काही वेळा आपण वाचलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या गाेष्टी आपल्या स्वप्नात येतात. स्वप्नामागे प्रत्येकवेळी गूढ अर्थ असेल असे नाही.

पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही हाेता, तेव्हा लाेकांना तशीच स्वप्न दिसायची. आता लाेकांना रंगीत स्वप्न दिसतात. 

Click Here