सकाळी लवकर उठणं जमत नाहीये.... फॉलो करा सोप्या ९ टीप्स 

सकाळी लवकर उठणं हा एक मोठा टास्क असतो. मात्र या सोप्या टिप्स वापरून सकाळ प्रसन्न करता येते.

उठल्यानंतर 15 मिनिटांच्या आत सूर्यप्रकाशात जा. सूर्यप्रकाशामुळे मेलाटोनिन (झोपेचे हॉर्मोन) तयार होणे थांबते आणि मेंदूला जागं होण्यासाठी संकेत मिळतात. 

फक्त जड जेवणच नाही, तर सिरीअल, पांढरा ब्रेड सारखे पदार्थांमुळे रक्तातील साखरेत अचानक चढ - उतार होतो. करतात. यामुळे झोपेत खंड पडतो आणि सकाळी जड वाटते. झोपण्यापूर्वी हलके व संतुलित अन्न घ्या.

रोज ठराविक वेळी झोपण्याची सवय लावल्यानं झोप चांगली लागते. गरम पाण्याने अंघोळ, शांत संगीत किंवा हर्बल टी यांसारख्या सवयी मेंदूला विश्रांतीसाठी तयार करतात.

अलार्म बंद करताच सौम्य लाईट लावा आणि बेडवरून हळूच उठा. याने अचानक धक्का बसत नाही आणि शरीर हळूहळू जागं होतं.

हलकी स्ट्रेचिंग केल्याने स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढतो व मज्जासंस्थेला सुरक्षित व सक्रिय होण्याचा संकेत मिळतो. त्यामुळे झोपेचं टाळणं सोपं होतं.

फोन वापरल्याने डोपामिन झपाट्याने वाढते, ज्यामुळे सुरुवातीला ऊर्जा जास्त वाटते पण नंतर थकवा येतो. त्याऐवजी सकाळ शांतपणे सुरू करा.

१८–२०°C तापमान झोपेसाठी आदर्श असतं. यामुळे शरीराचं तापमान नैसर्गिकरीत्या कमी होतं आणि झोप अधिक गाढ लागते, त्यामुळे सकाळी लवकर उठायला सोपं जातं.

मॅग्नेशियम स्नायू शिथील करतो आणि झोपेचे चक्र संतुलित ठेवतो. पालक, भोपळ्याच्या बिया, केळी सारखे नैसर्गिक स्रोत जास्त उपयुक्त असतात.

कॅफिन शरीरात बराच वेळ टिकतो आणि मेलाटोनिन रिलीज होण्यास उशीर लावतो. त्यामुळे दुपारनंतर चहा, कॉफी टाळल्याने रात्री झोप लागायला मदत होते.

Click Here