बियाणांशिवाय वाढवता येणारी ही रोपं तुम्हाला माहिती आहेत का?

प्रत्येक वनस्पतीला वाढण्यासाठी बियांची आवश्यकता नसते. 

प्रत्येक वनस्पतीला वाढण्यासाठी बियांची आवश्यकता नसते. काही रोपांचे मुळे, देठ किंवा पानांचा वापर करून पुनरुत्पादन करतात 

बटाट्याच्या कंदावरील "डोळ्यां" किंवा कळ्यांमधून कोंब वाढतात. असे बटाटे जमिनीत लावल्यावर ते सहजपणे अंकुरू शकतात.

आले हे भूगर्भातील राईझोममधून वाढते. आल्याचे पुनरूत्पादन हे त्याच्या देठांमधून होते. याची लागवड करणे सोपे असते.

कांदे बल्बद्वारे पुनरुत्पादन करतात. ओलसर वातावरणात कांद्याच्या गाभ्यातून नवीन अंकूर फुटातात त्यातूनच नवीन कांद्याचं रोप उगवतं. 

प्रत्येक लसणाची एक पाकळी नवीन वनस्पती तयार करते. लसून शेतात किंवा घरात देखील उगवता येतं. स्वयंपाक घरातील हा सहज पुनरूत्पादित करणारा घटक आहे.

पुदिन्याची मुळं किंवा गाठी पाण्यात किंवा जमिनीत सहज पुन्हा उगवता येतात. त्याला फारशी काळजी देखील घ्यावी लागत नाही.

हळदीच्या गाठी पाण्यात किंवा जमिनीत सहजरित्या पुन्हा उगवतात. त्याला देखील फारशा देखभालीची गरज लागत नाही. 

ऊस हा बियाणांऐवजी त्याच्या खोडाद्वारे पुन्हा लावला जातो. खोडाच्या गाठीतून किंवा डोळ्यातून सहज एक नवीन रोप उगवते. 

केळीची झाडे ही फळांमध्ये आढळणाऱ्या बियाण्यांऐवजी, कोंब किंवा नव्या फुटीतून पुनरुत्पादित होतात. या फांद्याची नवीन फूट ही झाडांमध्ये वाढते.

रताळ्याची लागवड ही त्याच्या जुन्या झांडांच्या फांद्यापासून केली जाते. या फांद्याची वाढ जमिनीत किंवा पाण्यात सहजरित्या करता येते. 

Click Here