केसांच्या आरोग्याचा आणि आहाराचा संबंध असून काही विशिष्ट अन्नघटक यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत.
पालकामध्ये आयरन, फोलेट आणि जीवनसत्त्व ए व सी मुबलक प्रमाणात असतात. हे घटक केसांच्या मुळांना पोषण पुरवतात आणि केस निरोगी ठेवतात.
रताळात बीटा-कॅरोटीन विपुल प्रमाणात असते, जे शरीरात केसांसाठी उपयुक्त असलेल्या जीवनसत्त्व ए मध्ये रूपांतरित होते. त्यामुळे केसांची वाढ आणि टाळू आरोग्य सुधारते.
सुकामेवा म्हणजे नट्स, ज्यामध्ये जीवनसत्त्व ई आणि हेल्दी फॅट्स असतात. हे केसांच्या टाळूला आणि केसांना पोषण पुरवण्यात मदत करते, केस मजबूत राहतात व चमकदार होतात.
बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असतात. यामुळे कोलाजेन निर्मिती वाढते आणि केसांची ताकद टिकून राहते.
डाळी किंवा बीन्स प्रथिन, आयरन आणि फोलेटने समृद्ध आहेत. हे घटक मिळाल्यास केस गळणे कमी होते आणि केस मजबूत राहतात.
ग्रीक योगर्टमध्ये प्रथिन आणि जीवनसत्त्व B5 चा समावेश असतो. त्यामुळे केस जाड आणि घनदाट होतात.
अवाकॅडोज हे व्हिटॅमिन ई ने समृद्ध आहे. तसेच त्यामध्ये असलेले गुड फॅट स्काल्पच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.