मंगळवारी शुभ योग जुळून येत असून, काही राशींना उत्तम लाभ मिळेल.
मंगळवार, ८ जुलै २०२५ रोजी त्रिकोण योग, चंद्र-शुक्राचा समसप्तक योग जुळून येत आहे. ज्येष्ठ नक्षत्र असून, चातुर्मासाचे पहिले भौम प्रदोष व्रत आहे.
मंगळवार या दिवसावर मंगळ ग्रहाचे अधिपत्य असते. तसेच या दिवशी गणपती आणि हनुमंतांचे विशेष पूजन केले जाते.
मेष: भाग्याची साथ, आनंदाची बातमी मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी लाभ होऊ शकेल. अडकलेले काम पूर्ण होऊ शकेल.
मिथुन: हाती घेतलेली कामे पूर्ण होऊ शकतील. धनलाभाची शक्यता. भागीदारीतून लाभ होऊ शकेल. शत्रू पराभूत होऊ शकतील.
सिंह: अनपेक्षित लाभ शक्य. विचारपूर्वक घेतलेले निर्णय हिताचे ठरू शकतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
तूळ: कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होऊ शकेल. बचतीच्या योजना आखू शकाल. एखादा धाडसी निर्णय घेऊ शकाल.
मकर: चांगल्या संधी मिळू शकतील. मित्रांसोबत मजा करू शकाल. अतिरिक्त लाभ शक्य. अध्यात्माकडे कल राहील.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.