क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी ८ महत्त्वाच्या टिप्स

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असणे आर्थिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 

तुमच्या कर्जाचे (EMI) आणि क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल वेळेवर भरा.

जी देणी खूप दिवसांपासून थकीत आहेत, ती लवकरात लवकर फेडा. यामुळे तुमचा स्कोअर लगेच वाढू लागतो.

क्रेडिट कार्डची संपूर्ण मर्यादा वापरण्याऐवजी, नेहमी ३०% पेक्षा कमी मर्यादा वापरा.

क्रेडिट स्कोअर खराब असताना लगेच नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू नका.

जुन्या क्रेडिट कार्ड खात्यांची पेमेंट हिस्ट्री चांगली असल्यास, ती बंद करू नका.

नियमितपणे तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासा. त्यात काही चूक असल्यास, ती दुरुस्त करून घ्या.

जर तुम्हाला लगेच क्रेडिट स्कोअर सुधारण्याची गरज असेल, तर तुम्ही एफडी किंवा सोन्यावर सुरक्षित कर्ज घेऊन वेळेवर परतफेड करू शकता.

क्रेडिट स्कोअर एका रात्रीत सुधारत नाही. यासाठी वेळ लागतो आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात.

Click Here