प्रफुल हिंगे ते शोएब अख्तर! IPL मध्ये दमदार पदार्पण करणारे ८ गोलंदाज

कुणी कोणत्या हंगामात केली कमाल

आयपीएल पदार्पणात ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणाऱ्या गोलदाजांच्या यादीत प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन यांनी एन्ट्री मारली आहे.

तुम्हाला माहितीये का? IPL पदार्पणात लक्षवेधी ठरलेल्या गोलंदाजांमध्ये पाकिस्तानच्या शोएब अख्तरचाही समावेश आहे. 

IPL २०१९ च्या हंगामात MI कडून पदार्पण करताना SRH विरुद्ध अल्झारी जोसेफ याने १२ धावा खर्च करून ६ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

२०१७ च्या हंगामात अंड्रू टाय याने गुजरात लायन्सकडून पदार्पण करताना रायझिंग पुणे सुपर जाएंट्स संघाविरुद्ध १७ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या होत्या.

२००८ च्या हंगामात शोएब अख्तरनं केकेआरकडून पदार्पणाचा सामना खेळताना डेक्कन चार्जर्स विरुद्ध ११ धावांत ४ विकेट्सचा डाव साधला होता.

२०२६ च्या हंगामात  SRH  कडून साकिब हुसेन याने राजस्थान विरुद्धच्या सामन्यात २४ धावा खर्च करून ४ विकेट्स घेत या यादीत स्थान मिळवले.

२०१२ च्या हंगामात केवन कूपर याने RR च्या संघाकडून पदार्पण करताना पंजाबविरुद्ध २६ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या होत्या.

२०२५ च्या हंगामात अश्वनी कुमारने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करताना केकेआरविरुद्ध २४ धावांत ४ विकेट्स घेतल्या होत्या.

२०१५ च्या हंगामात नामिबियाच्या डेव्हिड वीझेनं RCB कडून पदार्पणात मुंबई इंडियन्सविरुद्ध ३३ धावा खर्च करून चार विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

यंदाच्या हंगामात प्रफुल हिंगे याने SRH च्या संघाकडून पदार्पण करताना RR विरुद्धच्या साम्यात ३४ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या. 

Click Here