७ मार्ग- अभ्यास करताना मुलांची झोप पळेल दूर ! 

अभ्यास करायला घेतला की मुलांना आळस आणि झोप येऊ लागते. 

जास्त वेळ एकाच जागी अभ्यास करायला बसल्याने मुलांना झोप येते. अशावेळी थोडा वेळ विश्रांती घ्या. यामुळे ताण कमी होईल. 

मोठ्याने वाचा, यामुळे अभ्यास करताना एकाग्रता वाढते आणि झोप कमी येते. 

अभ्यास करताना नोट्स बनवा, आकृत्या काढा किंवा प्रश्न सोडवा यामुळे झोप येणार नाही. 

पाण्याची कमतरता झाल्यावर किंवा शरीर थकल्यानंतर अस्वस्थता वाटते. त्यामुळे अभ्यास करताना पाणी प्या. 

जड अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर अभ्यासाला बसू नका. यामुळे जास्त झोप येते आणि अभ्यास करण्याची इच्छा होत नाही. 

खुर्चीवर किंवा टेबलावर बसून वाचण्याचा प्रयत्न केल्याने लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. 

झोपून किंवा बेडवर बसून आरामशीर अभ्यास करत असाल तर जास्त झोप येते. त्यासाठी अभ्यास करताना नीट व्यवस्थित बसा. 

Click Here