सध्या आर्थिक स्वावलंबनासह आर्थिक स्वातंत्र्य असणं महत्त्वाचं आहे.
सध्या आर्थिक स्वावलंबनासह आर्थिक स्वातंत्र्य असणं महत्त्वाचं आहे. यासाठी पुढील ७ टिप्सचे न चुकता पालन करा.
दोन महिन्यांच्या पगाराची बचत : दोन महिन्यांच्या पगाराइतके पैसे बाजूला काढल्याने पैशांची चिंता राहणार नाही.
आपत्कालीन फंड : नोकरी जाणं किंवा वैद्यकीय आपत्कालीन स्थिती येऊ शकते. यासाठी किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्च करता येईल, इतका फंड तयार ठेवा.
मौजमस्तीसाठी वेगळे पैसे : मौजमजेसाठी कमाईतील ५ ते ७ टक्के भाग बाजूला काढा. या मर्यादेपेक्षा हा खर्च वाढू नये, याची काळजी घ्या.
निवृत्ती फंड सुरू करा : तुमचं वय २५ असो वा ३५ निवृत्तीसाठी बचत सुरू करा. हे जितक्या लवकर कराल, तितका कम्पाउंडिंगचा अधिक फायदा मिळेल.
कमाईचे इतर पर्याय शोधा : फक्त नोकरीवर अवलंबून न राहता घरबसल्या काही वस्तू बनविणं किंवा एखादा छोटा जोडधंदा करा.
नियमित गुंतवणूक करा : महिन्याच्या उत्पन्नातील ५ ते १० टक्के रक्कम शेअर मार्केट, एसआयपी, सोनं किंवा कोणत्याही इतर पर्यायात गुंतवा.
लवकर कर्जमुक्त व्हा : जर तुमच्याकडे ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजाचं कर्ज असेल, तर ते आधी फेडा.