भिजवलेल्या शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फैट असते. ओले शेंगदाणे उर्जेचा एक उत्तम स्त्रोत आहे. हे खाण्याचे आणखीही बरेच फायदे आहेत.
भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पचन क्रिया सुधारते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
भिजलेले शेंगदाणे हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत. यामुळे बॅड कोलेस्ट्र कमी होण्यास मदत होते. तसेच, हृदय रोगाची भीतीही कमी होते.
शेंगदाण्यातील मॅग्नेशियम स्नायुंचे दुखणे कमी करते आणि थकवा कमी करते.
शेंगदाणे भूक नियंत्रित करू शकतात. तसेच, अधिक कॅलरीजही बर्न करतात.
भिजवलेल्या शेंगदाण्यांमध्ये फोलेट असते, जे गर्भावस्थेत महिलांसाठी विशेष लाभदायक असते.
भिजलेले शेंगदाणे खाल्ल्याने ब्लडशुगर स्थिर ठेवण्यास मदत मिळते.
रोज भिजलेले शेंगदाणे खाल्यास तणावाची समस्या कमी होते. आणि मानसिक आरोग्य सुधारते.
टीप - प्रिय वाचक, ही माहिती केवळ सर्वसामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...!