७ जादुई हर्ब्स जे ह्रदय ठेवतात ठणठणीत!

आपल्या रोजच्या वापरातील हे ७ पदार्थ ठरतात ह्रदयासाठी वरदान

लसूण मधील अॅलिसिन नावाचे घटक असते जे वाईट (LDL) कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्तदाब कमी करते आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवते. 

हळदीतील कर्क्युमिन हा घटक सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतो. तो धमन्यांमध्ये प्लॅक साचू देत नाही आणि हृदयाचे रक्षण करतो. हळद काळी मिरीसोबत घेतल्यास चांगला फायदा होतो.

अर्जुना रिष्ट आयुर्वेदीय वनस्पती जी हृदयाच्या स्नायूंना बळकट करते, पंपिंग क्षमता सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित करते. हे चूर्ण किंवा काढा रूपात वैद्यकीय सल्ल्याने घेतले जाते.

तुळस तणावामुळे वाढणारा रक्तदाब कमी करण्यास मदत करते. कॉर्टिसॉल हार्मोन संतुलित ठेवते आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते. 

मेथी यात soluble fiber असतात, जे आतड्यातील कोलेस्ट्रॉल शोषण कमी करतात. तसेच, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात मदत होते, ज्यामुळे हृदयसंबंधी आजारांचा धोका कमी होतो. 

दालचिनी कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स कमी करण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सुधारण्यास मदत करते. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. ती चहा, भाजी, किंवा ओट्समध्ये घालू शकता.

आले रक्ताभिसरण सुधारते, सूज कमी करते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. ताजे, चहात किंवा स्वयंपाकात वापरल्यास हृदय निरोगी राहते.

Click Here