चाळिशी ओलांडली तरी 'या' ७ अभिनेत्री अजूनही सिंगल!

बॉलीवूडमध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी चाळिशी ओलांडली असतानाही लग्न न करण्याचा निर्णय घेतला...

वय झालं की लग्न केलंच पाहिजे, हा समज आपल्याकडे आहे. परंतु बॉलीवूडमध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी वयाची चाळिशी ओलांडली असतानाही लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांनी आपले करिअर, आयुष्य आणि स्वातंत्र्याला प्राधान्य दिलं. या अभिनेत्री यशस्वी कामगिरी, आत्मविश्वास आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जातात.

वयाची चाळिशी ओलांडूनही लग्न न केलेल्या अभिनेत्री कोण आहेत ते पाहूयात. 

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री तब्बू सध्या ५३ वर्षांची असूनही तिने लग्न केलं नाही. ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकते, पण खासगी आयुष्यात एकटीच आहे.

मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन ४८ वर्षांची असूनही अविवाहित आहे. तिने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत आणि ती त्यांच्यासोबतच आपले आयुष्य जगत आहे. 

सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या दत्ता ४७ वर्षांची असून, अजूनही ती अविवाहित आहे. 

काजोलची बहीण तनीषा मुखर्जी ४५ वर्षांची असून अजूनही अविवाहित आहे. करिअरकडे लक्ष देत ती सध्या आपल्या आयुष्याचा आनंद घेत आहे.

गदर फेम अमिषा पटेल वयाची पन्नाशी ओलांडूनही अजून देखील अविवाहितच आहे. 

शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी ४६ वर्षांची असून, ती अजूनही सिंगलच आहे. 

टीव्ही क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर ४८ वर्षांची असून अजूनही तिने लग्न केलेलं नाही. तिने सरोगसीद्वारे एक मुलगा दत्तक घेतला आहे.

Click Here