रोजच्या आहारातील काही भाज्यांमधून आपल्याला बैद्धिक क्षमता वाढवणारे पोषक घटक मिळतात.
निरोगी पौष्टिक आहार मेंदूच्या विकासास मदत करतो, रोजच्या आहारातील काही भाज्यांमधून आपल्याला बैद्धिक क्षमता वाढवणारे पोषक घटक मिळतात.
पालक आणि इतर पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, विशेषतः व्हिटॅमिन के आणि खनिजे जास्त असतात जे कॉग्नेटिव्ह घट रोखण्यास मदत करू शकतात.
ब्रोकली ही भाजी अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि इतर अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेली असते.
बीटमध्ये नायट्रेट्स भरपूर असतात, जे मेंदूला होणारा रक्त प्रवाह सुधारू शकतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवण्यास मदत करू शकतात.
बीटा-कॅरोटीनने समृद्ध, गाजर एकूण मेंदूच्या आरोग्यासाठी आणि कॉग्नेटिव्ह कार्यासाठी उपयुक्त ठरतं.
ब्रोकोलीप्रमाणेच, ब्रुसेल्स स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन के आणि सी तसेच फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे एकूण मेंदूच्या आरोग्यास लाभदायी ठरतात.
ढबू मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि मेंदूतील सूज कमी करण्यास मदत करू शकतात.