हिंदी सिनेमातले आजवरचे ६ सर्वाधिक महागडे ड्रेस...

बॉलिवूड चित्रपटांमध्ये महागडे आणि खास विशेष असे डिझायनर कपडे घातले जातात.


काही चित्रपटांमध्ये अभिनेता - अभिनेत्रींच्या कपड्यांवर प्रचंड खर्च करण्यात येतो. 

आत्तापर्यंत बॉलिवूड अभिनेत्रींनी चित्रपटांत घातलेले सगळ्यात महागडे कपडे कोणते आहेत ते पाहूयात. 

दीपिका पदुकोणने 'बाजीराव मस्तानी' चित्रपटांत अंजु मोदींनी अस्सल डायमंड आणि दागिन्यांनी डिझाईन केलेला ५० लाखांचा ड्रेस अनारकली ड्रेस घातला होता. 

'कंबख्त इश्क' चित्रपटांत करिनाने खास पॅरिसहून तयार करुन आणलेला ८ लाखांचा सीक्वेंनचा वन पीस घातला होता.   

ऐश्वर्या रॉयने 'जोधा अकबर' चित्रपटांत नीता लुल्ला यांनी डिझाईन्स केलेला २ लाखांचा लेहेंगा घातला होता, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. 

माधुरी दीक्षितने 'देवदास' चित्रपटांतील 'मार डाला' या गाण्याच्या निमित्ताने चक्क १२ लाखांचा हिरव्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता.   

'पद्मावत' चित्रपटांतील दीपिकाचा लेहेंगा ३० किलोंचा होता, त्याची किंमत २० लाख होती तर २०० कारागिरांनी मिळून तो लेहेंगा तयार केला होता. 

'तेवर' चित्रपटांतील 'राधा नाचेगी' या गाण्यासाठी सोनाक्षीने ७५ लाखांचा पांढराशुभ्र लेहेंगा घातला होता.

Click Here