तुम्हालाही ट्रेकिंगची आवड असेल, तर 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी!
भारतातील महाराष्ट्र हे राज्य वैविध्यपूर्ण भूगोल आणि इतिहासासाठी प्रसिद्ध आहे.
ट्रेकिंग प्रेमींसाठी महाराष्ट्रात अनेक डोंगरी किल्ले, दऱ्या आणि उंच पर्वत आहेत.
राजमाचीः शांत तलाव आणि दोन किल्ले असलेले हे ठिकाण आठवड्याच्या शेवटी ट्रेकिंग करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
हरिश्चंद्रगडः हा ट्रेक करताना दिसणारे सुंदर दृश्य मनाला मोहवणारे आहे. हा गड कोकणकड्यासाठी ओळखला जातो.
लोहगड किल्ला : हा महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाचा किल्ला असून, ट्रेकिंग प्रेमींसाठी पर्वणी आहे.
देवकुंड धबधबाः हा ट्रेक त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो.
कळसुबाई शिखर : महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, या ठिकाणाहून अद्भुत सूर्योदय दिसतो.
रतनगड किल्लाः हा ट्रेक प्रत्येकाने एकदा तरी करायलाच हवा. या गडावरुन विहंगम दृश्य तर दिसतेच, पण या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व देखील मोठे आहे.