सिनेमा ते राजकारण, ‘या’ ७ अभिनेत्रींचा प्रवास आहे खास...

या अभिनेत्री फक्त पडद्यावरच नाही, तर राजकारणातही झळकल्या...

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी फक्त रुपेरी पडद्यावरच नव्हे, तर राजकारणातही आपली ओळख निर्माण केली आहे.

बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींचा प्रवास ग्लॅमरस दुनियेपासून राजकारणापर्यंत पोहचला... 

कंगनाने अभिनयासोबतच २०२४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपची उमेदवार म्हणून हिमाचल प्रदेशातील मण्डी मतदारसंघातून विजय मिळवला. 

ड्रीमगर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेमा मालिनी भाजप पक्षामधून मथुरा येथून खासदार म्हणून निवडून येत राजकारणात यशस्वी प्रवेश केला. 

जया बच्चन समाजवादी पक्षाकडून खासदार म्हणून अनेक वेळा राज्यसभेवर निवडून आल्या. त्यांनी अभिनयासोबतच राजकीय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली.

 ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या स्मृती इराणी यांनी अभिनयातून लोकप्रियता मिळवल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 

 उत्तम अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या किरण खेर यांनी चंदीगढमध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक जिंकून खासदार म्हणून जबाबदारी सांभाळली.

‘रंगीला गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली उर्मिला मातोंडकर हिने अभिनयासोबतच राजकारणात देखील आपले वेगळे स्थान निर्माण केले.

Click Here

Your Page!