जाणून नियमित खायला सुरुवात कराल...!
कच्च्या केळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६ आणि फायबरसह अनेक पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर असतात.
पचन सुधारते : कच्च्या केळीमध्ये रेजिस्टंन्ट स्टार्च असतो जो पचन सुधारतो.
वजन नियंत्रण : कमी कॅलरीज आणि अधिक फायबरमुळे भूक कमी लागते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
रक्तातील साखरेचे नियंत्रण : कच्च्या केळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जो साखरेची पातळी स्थिर ठेवतो.
हृदयाचे आरोग्य : पोटॅशियम भरपूर असल्याने हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
मूत्रपिंडाचे आरोग्य : कच्च्या केळीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे मूत्रपिंडाचे कार्य सुधारते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते : कच्च्या केळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६ असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
टीप - आरोग्याशी संबंधित कुठलीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या...!