रक्षाबंधन फारच गोड झालं... फिट राहण्याच्या या आहेत ५ टिप्स

भारतीय सण मिठाईशिवाय अपूर्ण मानले जातात. रक्षाबंधन हा देखील असाच एक सण आहे. 

भारतीय सण मिठाईशिवाय अपूर्ण मानले जातात. रक्षाबंधन हा देखील असाच एक सण आहे. या दिवशी लाडूपासून बर्फीपर्यंत, सर्व काही खाल्ले जाते.

बहिणीच्या आग्रहाखातर अन् प्रेमापोटी खूप गोड खाणं होतं, इतके गोड पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला जड वाटू शकते किंवा तुमचे पोट फुगल्यासारखे वाटू शकते.

इतकेच नाही तर तुम्हाला जाड होण्याची भीती देखील वाटते. हेच टाळण्यासाठी काही टीप्स फॉलो करणं गरजेचं आहे. 

जेवण वगळू नका : 
जर तुम्ही काल खूप गोड पदार्थ खाल्ले असतील तर आज जेवण अजिबात स्कीप करू नका किंवा स्वतःला उपाशी ठेवू नका. 

२. चांगला नाश्ता : 
सकाळी प्रथिने आणि फायबरयुक्त नाश्ता खा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील आणि दिवसभर तुम्हाला ऊर्जा मिळेल.

३ संतुलित आहार :
 तुमच्या ठरलेल्या वेळी जेवा आणि कोणतेही जेवण वगळू नका. जर तुम्ही जेवण वगळले तर तुम्हाला जास्त भूक लागेल आणि नंतर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल.

४. पाणी आणि व्यायाम : 
अतिरिक्त साखर बाहेर काढण्यासाठी जास्त पाणी प्या. तसेच, हलके  व्यायाम करा यामुळं रक्तातील साखर कमी करण्यास आणि मूड सुधारण्यास मदत करतील.

५. फार मनावर घेऊ नका : 
कधीकधी जास्त गोड खाणे ही मोठी गोष्ट नाही. फक्त तुमच्या निरोगी जीवनशैलीकडे परत या, कारण दीर्घकाळ पाळलेल्या सवयी एका चीट दिवसापेक्षा जास्त महत्वाच्या असतात.

Click Here