5 स्टार हॉटेलमध्ये जाताय? या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर होईल हसू
पहिल्यांदाच पंचतारांकित हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी घ्या ही काळजी
जर तुम्ही पहिल्यांदाच पंचतारांकित हॉटेलमध्ये जात असाल तर काही गोष्टींची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे.
5 स्टार हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी योग्य कपडे परिधान करणं गरजेचं आहे. यातून तुमचा आत्मविश्वास, पर्सनालिटी दिसून येते.
अनेक 5 स्टार हॉटेलमध्ये टिपिंग देण्याची पद्धत असते. ही कंम्पलसरी नसलं तरी तो शिष्टाचाराचाच एक प्रकार आहे. ही टीप १०० ते ५०० पर्यंत असावी. त्याच्यापुढे नसावी.
5 स्टार हॉटेलमधील शिष्टाचाराचे नियम माहित असणं गरजेचं आहे. जेवणाचे नियम, पदार्थांच्या किंमतीदेखील माहिती असाव्यात.
पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवताना कटलरी कशी ठेवावी याचीही माहिती असावी.
पंचतारांकित हॉटेलमध्ये राहताना, कर्मचाऱ्यांशी नम्रतेने बोलणे आवश्यक आहे, तसेच त्यांच्या मदतीसाठी त्यांचे आभार मानणे गरजेचे आहे.