५ स्मार्ट टिप्स- शुगर, कॅलरी खाणं राहील कंट्रोलमध्ये...

पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.. जास्तीची शुगर आणि कॅलरीज घेणं आपोआप कमी होईल...

बाजारात मिळणारे पॅक ज्यूस, सोडा, कोल्ड्रिंक्स पिणं पूर्णपणे टाळा.

कोणताही पॅकबंद पदार्थ बाजारातून विकत आणताना त्यामध्ये किती कॅलरी आणि किती शुगर आहे हे तपासा. प्रमाण जास्त पाहून तो पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते.

गोड खाण्याची खूपच इच्छा होत असेल तर बाजारात मिळणारी हंगामी गोड फळं खा.

दालचिनीचा काढा, जायफळाचा काढा घ्या. शुगर क्रेव्हिंग कमी हाेईल आणि आरोग्यालाही कित्येक फायदे मिळतील.

बिस्किट, चिप्स असे पदार्थ खाणं बंद करा. त्याऐवजी मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे, मखाना, सुकामेवा असे हेल्दी पर्याय निवडा. 

Click Here