पालक अनेकदा मुलांवर ओरडतात किंवा त्यांच्यावर प्रेशर द्यायचा प्रयत्न करतात.
बऱ्याचदा मुलांना शिस्त लावायच्या नादात पालकांकडून नकळतपणे अशा काही चुका होतात. ज्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो.
पालक अनेकदा मुलांवर ओरडतात किंवा त्यांच्यावर प्रेशर द्यायचा प्रयत्न करतात. यामुळे मुले भित्री होतात. म्हणूनच, पालकांनी मुलांसोबत वागतांना कोणत्या चुका टाळायच्या ते पाहुयात.
अनेकदा पालकांच्या अती दबावामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो आणि ते खोट बोलायला लागतात.
परिक्षेत किंवा एखाद्या स्पर्धेत मुलांना अपयश आलं तर लगेच 'तुला काही येतच 'नाही', 'तुला जमतच नाही', अशी त्यांच्यावर लेबल लावू नका. अशा लेबलमुळे त्याच्यातील आत्मविश्वास कमी होतो.
कधीही मुलांची तुलना इतर मुलांशी करु नका. प्रत्येक मूल, त्याच्यातील क्वालिटी या वेगवेगळ्या असतात. तुलना केल्यामुळे मुलं स्वत:ला कमकुवत समजू लागतात.
मुलांच्या भावनांचा आदर करा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका. तसंच जर तुम्ही मुलांच्या भावना दाबण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यात भावनिक असुरक्षितता निर्माण होते. ज्यामुळे ते आत्मविश्वास गमावतात.