आनंदी राहण्याचे ५ सोपे मार्ग!

जीवनात कितीही संघर्ष असला तरी या परिस्थितीत आनंदी कसं रहावं हे ओशो यांनी सांगितले आहेत.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:ख, स्ट्रगल हे असतंच असतं. परंतु, या परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणं तितकंच गरजेचं आहे. तरचं सगळ्या समस्या दूर होतील.

जीवनात कितीही संघर्ष असला तरीदेखील या परिस्थितीत आनंदी कसं रहावं याचे ५ मार्ग ओशो यांनी सांगितले आहेत.

मुळात आनंद हा आपल्या वर्तमानातच आहे. त्यामुळे भुतकाळाचा किंवा भविष्याचा विचार करत बसलात तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. म्हणूनच, जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा.

कोणताही व्यक्ती परफेक्ट नसतो. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसं स्वत:ला स्वीकारा. स्वत:मध्ये चुका काढू नका. त्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे ते आनंदाने स्वीकारा. 

आपले विचार, भावना कधी मनात दाबून ठेवू नका. त्यापेक्षा स्पष्टपणे व्यक्त व्हा. मनात एखादी गोष्ट दाबून ठेवली की तिचा त्रास होतो. त्यामुळे जे वाटतंय ते बोलून मोकळं व्हा. यातून तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल.

दिवसातून १०-१५ मिनिटे नक्की ध्यान करा. यामुळे मन:शांती मिळेल.

कोणत्याही गोष्टीचं ओझ मनावर घेऊन फिरू नका. समाधानी रहा. जेवढ्या तुमच्या अपेक्षा कमी तेवढा तुम्हाला होणारा त्रास कमी. त्यामुळे अनावश्यक गोष्टींमध्ये गुंतू नका.

जगातील असा देश जेथे तुरुंगही नाही अन् कैदीही!

Click Here