काळं मीठ आहे अत्यंत गुणकारी, जाणून घ्या त्याचे ५ फायदे
आज आपण गुणकारी ठरणाऱ्या काळ्या मिठाचे काय फायदे जाणून घेणार आहोत.
आपल्या आहारात कोणतं मीठ असावं याबाबत अनेक मत मतांतर आहेत. काही आयोडीनयुक्त मीठ खातात, काही लोकं गुलाबी मीठ खाणं पसंत करतात.
आज आपण जळजळ, पचन क्रियेपासून मधुमेहासाठी देखील गुणकारी ठरणाऱ्या काळ्या मिठाचे काय फायदे जाणून घेणार आहोत.
काळ्या मीठ युकृतातील पाचक रसायन उत्पादन करण्यास मदत करतं. त्यामुळं जळजळ आणि पोटफुगी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
काळं मीठ शरिरातील पाचक रस तयार करण्यास चालना देतं. त्यामुळं छोट्या आतड्यातील फॅट सोल्युबल व्हिटॅमीन शोषून घेण्याची प्रक्रिया सुधारते.
काळ्या मीठामुळं शरिरातील कॉलेस्ट्रॉलच प्रमाण नियंत्रणार राहण्यास मदत होते. काळं मीठ हे नैसर्गिकरित्या रक्त पातळ करतं त्यामुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो.
काळं मीठ हे रक्तातील ग्लुकोजचा स्तर देखील नियंत्रणात ठेवतं. त्यामुळं मधुमेहाविरूद्ध लढण्यात देखील काळं मीठ प्रभावी ठरतं
काळ्या मीठात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. पोटॅशियम हे स्नायूंचे कार्य सुरळीत सुरू राहण्यात मदत करते.
काळं मीठ जरी अनेक बाबतीत गुणकारी ठरत असलं तरी त्याचे काही साईड इफेक्ट देखील आहेत.
काळया मीठात फ्लोराईड सारखे काही रासायनिक घटक असतात. त्यामुळं काळ्या मीठाचं प्रमाणाबाहेर सेवन केल्यास किडनी स्टोन, थायरॉईड उद्भवू शकतो.