किडनीला हानी पोहोचवणाऱ्या ५ सवयी

किडनी आपल्या शरिरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे.

किडनी शरीरातून युरियासारखे टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. यामुळे रक्तातील पाणी, मीठ, खनिजांचे संतुलन राखले जाते. 

मात्र, तुमच्या काही दैनंदिन सवयी किडनीला हानी पोहोचवतात आणि तुम्हाला त्याची जाणीवही नसते. या छोट्या सवयी सुधारल्या पाहिजेत.

मर्यादित प्रमाणात मीठ सेवन करावे. जास्त मीठ तुमच्या किडनीला हानी पोहोचवते. यामुळे इतर अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

किडनी स्वच्छ करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे आहे. पाण्याअभावी किडनीवर विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी जास्त दबाव पडतो.


तुम्ही प्रत्येक वेदनेसाठी वेदनाशामक औषध घेत असाल, तर तुमची ही सवय किडनीला हानी पोहोचवू शकते. 

धूम्रपान किंवा मद्यपान करणे हे केवळ तुमच्या किडनीसाठी हानिकारक नाही, तर त्याचा शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.


तुम्ही कामामुळे तासन्तास बसून राहता आणि शौचालयालाही जात नसाल, तर तुमची ही सवय किडनीला हानी पोहोचवते.

Click Here