नातवंडांसमोर आजी-आजोबांनी पाळा 'हे' महत्त्वाचे नियम

आजी-आजोबांनी टाळा या गोष्टी

घरात लहान मुल असेल तर त्यांच्यावर आजी-आजोबांचं विशेष प्रेम असतं. ज्यामुळे अनेकदा मुलांना शिस्त लावतांना आई-वडिलांना अडचणी येतात.

आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊयात ज्या आजी-आजोबांनी लहान मुलांसमोर करणं टाळलं पाहिजे. या टिप्स चाइल्ड सायकोलॉजिस्ट श्वेता गांधी यांनी सांगितल्या आहेत.

आजी-आजोबा कायम लहान मुलांचे प्रत्येक लाड पूर्ण करतात. ज्यामुळे मुलं हट्टी होतात. त्यामुळे मुलांना प्रत्येक गोष्टीत सूट देऊ नका.

लहान मुलांची आपआपसात तुलना करु नका. यामुळे मुलांवर निगेटिव्ह परिणाम होतो. त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, रागाची भावना वाढते.

लहान मुलांच्या आई-वडिलांनी त्याच्यासाठी तयार केलेलं रुटीन कधीच चेंज करायचा प्रयत्न करु नका. रात्रभर जागरण करणं, जंक फूड देणं यासारख्या गोष्टी कटाक्षाने टाळा.

मुलांसमोर त्यांच्या आई-वडिलांची निंदानालस्ती करु नका. यामुळे मुलांवर नकारात्मक परिणाम होतो. मूलं मोठ्यांचा आदर करायचं सोडून देतात.

फक्त गाजर अन् बीट नाही, तर या पदार्थांमुळेही दूर होते रक्ताची कमरता

Click Here