जाणून लगेच खायला सुरुवात कराल...!
सुख्या मेव्यांपैकी खारीक, हे देखील एक अतिशय पोष्टिक फळ आहे. बरेच लोक, खारीक दुधात भिजवूनही खातात.
खारकेमध्ये फायबर, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे अशी अनेक खनिजे असतात.
खारीक ही महिला आणि पुरुष दोघांसाठीही वरदाना आहे. जाणून घेऊयात खारीक खाण्याचे फायदे...
खारकेमध्ये नैसर्गिक साखर असते. त्यात ग्लुकोज, सुक्रोज असते. हे शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करते.
खारकेमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमने मोठ्या प्रमाणावर असते, यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.
साधारणपणे पुरुषांना खारीक खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे लैंगिक शक्ती, स्टेमिना आणि स्पर्म काउंट वाढतो, असे बोलले जाते.
खारकेमध्येही लोह मोठ्या प्रमाणाव असते. यामुळे शरीर सशक्त राहते. खारीक रोज खाल्ल्याने हिमोग्लोबिनही मेंटेन राहते.
खारीक खाल्ल्याने हृदयदेखील चांगले राहते. रक्ताभिसरण योग्य प्रकारे चालते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते.