शरीरात पुरेशी एनर्जी नसेल तर कोणतंही कामं केलं की लगेच दम लागतो. यात अनेकदा ठराविक अंतर चालल्यानंतरही दम लागतो.
शरीरातील स्टॅमिना वाढविण्यासाठी आपल्या आहारात ५ महत्त्वपूर्ण पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. ते पदार्थ कोणते पाहुयात.
सुकामेवा हा शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सुकामेवामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, प्रोटीन, व्हिटामिन यांचं पुरेपूर प्रमाण असतं. ज्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. सोबतच रक्ताभिसरणंही सुरळीत होतं.
व्हाईट राईसच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये स्टार्च कमी असतं. आणि, फायबरचं प्रमाण जास्त असतं. तसंच ब्राऊन राईसमध्ये कार्बोहायड्रेट असते. ज्यामुळे मसल्स मजबूत आणि स्टॅमिना वाढते.
केळ्यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शारीरिक उर्जा तर वाढतेच. शिवाय स्टॅमिना वाढण्यास देखील मदत करते.
आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा.पालेभाज्यांमध्ये फायबर, व्हिटॅमिन यासह इतर पौष्टीक घटक असतात. ज्यामुळे अशक्तपणा दूर होते. आणि दिवसभर एनर्जी राहते.
सफरचंद आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यात कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.