गुरुवारी ५ राशींवर स्वामींची विशेष कृपा!

गुरुवार, २६ जून २०२५ रोजी त्रिग्रही ३ राजयोग जुळून येत आहेत.

गुरुवार, २६ जून २०२५ रोजी चंद्र मिथुन राशीत असेल. या राशीत गुरु आणि सूर्य ग्रह विराजमान आहेत. या तीन ग्रहांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे.

चंद्र-सूर्याच्या युतीने शशि आदित्य राजयोग, सूर्य-गुरु यांच्या युतीने गुरु आदित्य राजयोग, गुरु-चंद्र युतीने गजकेसरी राजयोग जुळून येत आहे.

गुरुवार या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. तसेच गुरुवारी दत्तगुरु, स्वामींचे विशेष पूजन केले जाते. 

गुरुवारी गजकेसरी राजयोगासह असलेले शुभ योगात स्वामींची विशेष कृपा कोणत्या राशींवर होऊ शकेल? पाहुया...

मेष: दिवस शुभ ठरू शकेल. करिअरमध्ये यश मिळू शकेल. विविध लाभ होऊ शकतील. मन प्रसन्न राहू शकेल.

मिथुन: दिवस खास ठरू शकेल. व्यापारात यश मिळू शकेल. इच्छा पूर्ण होऊ शकेल. नोकरीत सहकार्य लाभेल.

सिंह: अकल्पनीय लाभ होऊ शकतील. धनप्राप्तीचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतील. व्यापारी सौद्यात नफा मिळू शकेल.

धनु: सुख-सौभाग्य प्राप्त होऊ शकेल. भागीदारीतून लाभ मिळू शकेल. धनलाभ शक्य. नवीन काम सुरू करू शकाल.

मीन: विविध लाभ होतील. मन प्रसन्न होईल. प्रॉपर्टी डिलिंगमधून नफा होऊ शकेल. वाहन सुख मिळू शकेल.

- सदर माहिती सामान्य गृहीतके, ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

Click Here